नाव नोंदणी ही ऑनलाइन व प्रत्यक्ष भेट घेऊन करता येउ शकते.
नाव नोंदणी करिता संस्थेकडे आपली पुढील कागदपत्रे व संस्थेची फि भरावी लागेल.
बायोडाटा २ प्रत,
पोस्टकार्ड साइझ कलर फोटो (४x६) २ प्रत,
कुंडली (पत्रिका) २ प्रत
संस्थेचे सभासदत्व एक वर्षाकरिता राहील. एकावर्षानंतर नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
एक वर्षाकरिता संस्थेची नोंदणी फि रु.१५००/- आहे. नूतनीकरणासाठी फी रु.१२००/- भरावी लागेल.
नोंदणी फी व नूतनीकरण फी रोखीने, मनीआर्डरने, डीडीने अथवा चेकने स्वीकारली जातील.
सभासद नोंदणी फी, नूतनीकरण फी पुढील बँक अकॉउंट मध्ये जमा करू शकतात.
बँक अकाउंटची माहिती
Account Name : Shivsahyadri vadhuvarsuchak Kendra,
Account No. : Saving Account 10316,
Bank : S.S. Bank,
Branch : Vashi Branch,
IFSC CODE :
नियम व अटी
एकदा भरलेली फी कोणत्याही कारणात्सव परत केली जाणार नाही.
नवीन नोंदणी झालेल्या स्थळांची माहिती वेबसाइट वर व प्रत्यक्ष भेट घेऊन ऑफिसमध्ये बघता येईल.
संस्थेच्या वेबसाइटवर स्थळांचे पत्ते व फोननंबर नसतात. अनुरूप असलेल्या स्थळांचा नोंदणी क्र. ऑफिसमध्ये कळवून त्याची माहिती घ्यावी.
फोन कार्यालयीन वेळेतच करावा. आपण दिलेल्या फॉर्ममधील फोननंबरवरुनच फोन करावा.
एका सभासदास फोनवरून एकावेळेस जास्तात जास्त ५ आईडी नंबरचे (स्थळांचे) फोननंबर मिळतील.
ऑफिस टाईमिंग सकाळी १०.०० ते १ व दुपारी ४ ते ७.
सभासदांना वधुवरांची यादी पाहणेस मिळेल. त्यामध्ये आपल्या अपेक्षेनुसार योग्यतेप्रमाणे जे स्थळ हवे असेल त्याचा नोंद्णी क्रमांक दिले नंतर नोंदणीनुसार संबंधीत स्थळाची माहिती दिली जाईल.
केंद्रा तर्फे सुचविलेल्या स्थळांना आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा.
संस्थेकडुन घेतलेल्या स्थळाची माहिती अन्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तिस किंवा संस्थेस देउ नये. तसे निदर्शनास आल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल.
विवाह ठरले नंतर तसे संस्थेस सुचित करणे गरजेचे आहे. त्यानुसार आपली माहिती, फोटो व कागदपत्रे परत देणे सोईचे होईल.
संस्थेमध्ये पुरवली जाणारी वधु/वर यांची माहिती स्वत: किंवा नातेवाइक (फॉर्म भरणारी व्यक्ति)
यांनी स्वत:चे जबाबदारी वर दिलेली असते, तरी त्याची सत्यता पडताळून पहाणे ही प्रत्येकाची जवाबदारी आहे, त्यास संस्था जवाबदार राहणार नाही.
वरील प्रमाणे नियम मान्य असतील त्यांनीच या केंद्रात नोंदणी करावी.
नियम व अटी बदलण्याचा अधिकार केंद्राने राखुन ठेवला आहे.