सुस्वागतम्
शिवसह्याद्री वधु-वर सुचक केंद्र आपले स्वागत करित आहे, शिवसह्याद्री वधु-वर सुचक केंद्र आपले स्वागत करित आहे.
आणि परिवार म्हणजे कुटुंब...कुटुंब म्हटले म्हणजे त्या कुटुंबातील लहानग्यापासून जेष्ठापर्यंतच्या व्यक्ति. अशा या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय सोहळा म्हणजे लग्न..! आणि याच सोहळयाच्या निमित्ताने आम्ही आपल्या परिवारपर्यंत पोहचण्यासाठी केलेला हा प्रयत्न... आपण कामाच्या किंवा व्यवसायाच्यानिमित्ताने गावापासून दूर जातो. प्रत्येकजण या धकाधकी, धावपळी, आणि गर्दीमध्ये कुठेतरी हरवलेला दिसतो. सर्वजण आपआपल्या कामामध्ये व्यस्त, पण या सर्वामध्ये आपली मुले मुली कधी लग्नासाठी येतात त्याची कल्पना सुध्दा नसते अशा परिस्थितीत चांगले स्थळ मिळणे किंवा लग्न जमविणे खूप कठीण होते आणि यामुळेच शिवसहयाद्री परिवाराने यामध्ये सहभाग घेवून या केंद्राची स्थापना केली आहे.
वधू किंवा वर हे ज्या क्षेत्रामध्ये काम करीत असतील त्या क्षेत्राशी निगडीत किंबहुना त्याच्या आवडी निवडी प्रमाणे आपला जोडीदार मिळावा यासाठी आपण ऑनलाईन अर्ज भरून किंवा केंद्राच्या कार्यालयाच्या पत्यावर प्रत्यक्ष भेट देवून नांव नोंदवू शकता आणि घरबसल्या आपला जोडीदार, जावई किंवा सून शोधू शकता.
श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई)
संस्थापक: शिवसह्याद्री परिवार
नाती जन्मोजन्मीची परमेशवराने ठरवलेली दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीम गाठीत बांधलेली..., ऋुणानुबंध मनाचे, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण, नाते आयुष्याचे